Mamurdi News : गंजलेल्या, मोडकळीस आलेल्या डिपी, फिडर पिलर बाबत स्नेहा गाडे यांचे महावितरणला निवेदन

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 16 मधील साई नगर, राऊत नगर आणि चिंतामणी रोड, मामुर्डी या भागातील डि पी, फिडर पिलर गंजलेले व मोडकळीस आले आहेत. तसेच, डि पी आणि फिडर पिलरच्या आजूबाजूला अस्वच्छता व वेली, झाडे-झुडपे वाढले आहेत. 

याबाबत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी करणारे निवेदन, भाजप चिंचवड किवळे मंडळ महिला मोर्चा सरचिटणीस स्नेहा गाडे, उपाध्यक्ष नंदा मुन्द्रे आणि उषा गाडे यांच्या वतीने रावेत विभागाचे वरिष्ठ अभियंता तळपे यांना देण्यात आले आहे.

‘प्रभाग क्रमांक 16 मधील साई नगर, राऊत नगर आणि चिंतामणी रोड, मामुर्डी या भागातील डि पी मोडकळीस आलेले व गंजलेले आहेत. हे धोकादायक असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी आणि ट्रान्सफ़ार्मरच्या आजूबाजूची स्वच्छता करण्यात यावी’, असे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.