Pimpri News : ‘आल्फा लावल’ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुभासिस दास 

एमपीसी न्यूज – ‘आल्फा लावल’ (Alfa Laval) कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुभासिस दास (Subhasis Das) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनंता पद्मनाभन यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यांच्या जागेवर दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सुभासिस दास यांना 28 वर्षांचा दिर्घ अनुभव आहे. यापूर्वी कोल इंडिया, शेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सॅन्डविक या कंपनीत त्यांनी उच्च पदावर काम केलं आहे. दास यांनी आयआयटी (IIT) (आयएसएम) धनबाद येथून खाण अभियंता म्हणून शिक्षण घेतले आहे. दास यांचा दिर्घ अनुभव आणि शिक्षणाचा कंपनीला नक्कीच फायदा होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.