Supreme Court : गृहिणींचं कामही महत्त्वाचं, त्यांचा पगारही ठरवायला हवा – सर्वोच्च न्यायालय

एमपीसी न्यूज – घरी काम करणाऱ्या गृहिणींचं कामही त्यांच्या ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याच्या कामाइतकचं महत्त्वाचं असतं. गृहिणीसुद्धा देशाच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक जडघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतात. महिलांना वेतन देण्याच्या निर्णयाचं न्यायालयाने स्वागत केलं असून असं केल्यास सामाजिक समानता निर्माण होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल ठरेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

2014 साली दिल्लीत झालेल्या एका अपघातामध्ये मरण पावलेल्या दांपत्याच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये न्यायालायने हे निरिक्षण नोंदवलं आहे. आपल्या जवळच्या आणि प्रेमाच्या व्यक्तींसाठी गृहिणी करत असलेल्या कामाचा मोबदला ठरवण्यासाठी ठोस असा हिशेब किंवा सूत्र ठरवता येणार नाही. अशावेळेस न्यायालय कायमच गृहिणी करत असलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये अगदी निर्मळपणे काय मोबदला देता येईल यासंदर्भात विचार करुन निर्णय घेण्याचा प्रयत्न करतं, अस या निकालात म्हटलं आहे.
घरी असणारी कामांची संख्या आणि व्याप्ती पाहता या कामासाठी घरातील व्यक्ती जेवढा वेळ आणि कष्ट खर्च करतात तो खरोखरच आश्चर्यचकित करणारा असतो. सामान्यपणे हे काम पुरुषांपेक्षा महिलाच करताना दिसतात. गृहिणी किंवा घरातील सर्व काम करणाऱ्या घरातील सदस्यांपैकीच एक असणाऱ्या व्यक्तीला प्रतिकात्मक वेतन देण्याची आवश्यकता असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. यामुळे या व्यक्ती खरोखरच कुटुंबाच्या आर्थिक स्थितीसहीत राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी कारणीभूत ठरतात हे दाखवून देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.