Supriya Sule : शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा झाला की राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येते – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : राज्यातील विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात शरद पवार यांची जाहीर सभा सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. आणि या सभेत पावसात भिजतच शरद पवार यांनी भाषण केले. त्यानंतर राज्याचे राजकारण हे बदललेलं संपूर्ण देशांना पाहिलं. पुढे जाऊन महाविकास आघाडीची सत्ता देखील राज्यात आली. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीने पुन्हा राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात जाऊन बसला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्तेत येण्याविषयी विधान केलं आहे.

सुप्रिया सुळे बुधवारी इंदापूर तालुक्यातील निरनिगाव येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आत्मविश्वास दाखवताना शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचे कौतुक केले. विरोधी पक्षात असल्यानंतर शरद पवार हे दौऱ्यावर निघतात पण त्यांच्या दौऱ्याने काय गंमत होते माहित नाही. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा देशात सकारात्मक परिणाम दिसेल

सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणुकीत पडझड होतच राहते हे आमच्यापेक्षा जास्त कुणीही अनुभवले नाही. शरद पवार यांच्या 55 वर्षाच्या काळात अनेक चढउतार आले आहेत. यातील 27 वर्ष सत्तेत आणि 27 वर्ष विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगत असते की, या महाराष्ट्राने (Supriya Sule) तुम्हाला प्रेम दिलंच मात्र विरोधात असताना देखील महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.