Sushant Singh Rajput Death: रिया चक्रवर्तीची तब्बल 11 तास चौकशी

Sushant Singh Rajput Death: Riya Chakrabarti interrogated for 11 hours सुशांतच्या आत्महत्येसंबंधित रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ती सकाळी 11.30 वाजता पोलीस ठाण्यात पोहोचली आणि रात्री 10.15 च्या सुमारास ती तेथून निघाली.

एमपीसी न्यूज- सुशातंसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या कारणांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस टप्प्याटप्प्याने त्याच्या निकटवर्तीयांचे जबाब घेत आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांचे जबाब पूर्वीच घेतले आहेत. आता रिया चक्रवर्तीची वांद्रे पोलीस ठाण्यात बोलावून सुमारे 11 तास चौकशी केली आहे. रियाच्या चौकशीबाबतच्या काही गोष्टी आता समोर येत आहेत.

सुशांतच्या आत्महत्येसंबंधित रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ती सकाळी 11.30 वाजता पोलीस ठाण्यात पोहोचली आणि रात्री 10.15 च्या सुमारास ती तेथून निघाली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रिया आणि सुशांतचे संबंध, चित्रपटक्षेत्रातील लोकांशी सुशांतचे संबंध, रिया सुशांतच्या घरी राहायला जाणे, दोघांचा विवाह आदींशी निगडीत जबाब नोंदवण्यात आले.

रिया आणि सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डेटिंग करत होते. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, दोघे याचवर्षी विवाह करणार होते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रियाने यावर्षअखेरीस दोघे विवाह करणार होतो, असे सांगितले.

पोलिसांनी रिया आणि सुशांतचे कॉल रेकॉर्डही स्कॅन केले आहेत. रियाबरोबर कधी आणि कोणत्या विषयांवर सुशांतची चर्चा झाली याचीही पोलिसांनी चौकशी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.