Talegaon: नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्या; किशोर भेगडे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Talegaon: corporater kishor bhegade demands rs 50 lakh insurance for municipal corporation employees कोरोनामुळे एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहायला हवे. त्यासाठी नगरपरिषदेतील कर्मचा-यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा वातावरणात नगरपरिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी जोखीम पत्करून कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. दुर्दैवाने कोरोनामुळे एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहायला हवे. त्यासाठी नगरपरिषदेतील कर्मचा-यांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक व स्थायी समिती सदस्य किशोर भेगडे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांकडे केली आहे.

भेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध चाचणी, उपचार व मदतकार्य यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावताना नगरपरिषदेतील विविध प्रवर्गातील कर्मचारी यांचा कोरोना विषाणूशी जवळून संबंध येत असतो.

मोठयाप्रमाणात कोविड संबंधित कर्तव्ये पार पाडत आहेत. अशा कर्मचा-याला पाठबळ देण्याच्या दृष्टीने व अशा कर्मचा-याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याच्या शासन निर्णयानुसार 50 लक्ष रकमेचे सर्वंकष विमा कवच जाहीर करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे भेगडे यांनी केली आहे.

नगरपरिषदेचे कर्मचारी काम करतात त्यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये ठेकेदारी पध्दतीने काम करणारे कर्मचारी सुद्धा काम करत आहेत, त्याअर्थी ठेकेदारी पध्दतीने काम करणा-या कर्मचारी वर्गालाही त्याचा लाभ मिळावा असेही म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.