Talegaon Dabgade : सुनील शेळके यांचे राजकीय क्षेत्रातील कामाचा तमाम कुस्तीगीरांना अभिमान वाटतो – महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख

एमपीसी न्यूज – कुस्तीमुळे आत्मविश्वास बळकट होत (Talegaon Dabgade)असल्याने पैलवान कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक करू शकतो. त्यामुळे तरूणांनी कुस्तीकडे वळले पाहिजे. आमदार सुनील शेळके हे देखील पैलवान असून राजकीय क्षेत्रातील त्यांचे काम पाहून तमाम कुस्तीगीरांना त्यांचा अभिमान वाटतो,असे प्रतिपादन यंदाचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने शुक्रवारी (दि.17) येथे केले.आंतरराष्ट्रीय कुस्ती जगतात भारताचा तिरंगा झळकावण्याचा निर्धार त्याने यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात केवळ 22 सेकंदात चितपट कुस्ती करून नवा विक्रम केलेला यंदाचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आमदार सुनील शेळके, सारिका शेळके,शंकरराव शेळके, सुदाम शेळके,साहेबराव कारके, पै.अनिकेत घुले,संजय बाविस्कर आदिंनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. परिवारातर्फे सिकंदरचा सत्कारही करण्यात आला.
Chinchwad : उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरून एकास मारहाण
शेळके कुटुंबाचे आणि कुस्तीचे नाते गेल्या तीन (Talegaon Dabgade)पिढ्यांचे आहे. स्वतः आमदार सुनील शेळके हे देखील पैलवान आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पै.सिकंदरच्या या भेटीला विशेष महत्व आहे.
पैलवान सिकंदरच्या सततच्या उंचावत असलेल्या गादी आणि मातीतील कुस्तीच्या खेळामुळे ऑलिम्पिकमध्ये या गुणी मराठी कुस्तीपटूने आशा पल्लवित केल्याचे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्याचा शब्दही त्यांनी या उमद्या ‘महाराष्ट्र केसरी’ला दिला. मावळ तालुक्यातील शिवली येथील पै.मारुती आडकर हे 1972 मध्ये ऑलिम्पिक कुस्तीत भाग घेतलेले पहिले खेळाडू. त्यानंतर गेल्या 51 वर्षात महाराष्ट्रातील एकाही कुस्तीपटूला आजपर्यंत ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची कामगिरी बजावता आलेली नाही.
कुस्ती आणि शेळके कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे नाते
आमदार सुनील शेळके यांचे वडील पै. शंकरराव शेळके. त्यांचे चुलते पै. माधवराव शेळके, त्यांचे वडील पैलवान पांडुरंगराव शेळके हे त्याकाळातील नामांकित कुस्तीपटू होते. माजी नगराध्यक्ष पै. सचिन शेळके हे देखील मोठे पैलवान म्हणून ओळखले जात होते. कोल्हापूर, पुणे आणि श्रीक्षेत्र देहू येथील तालमीत शेळके कुटुंबातील तीन पिढ्यातील अनेकांनी घाम गाळून कुस्तीशी असलेले जिव्हाळाचे नाते जोपासले. आता आमदार म्हणून सुनील शेळके हे मावळातील कुस्तीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी काय करणार हा कुस्तीप्रेमींमध्ये औत्सुक्याचा विषय आहे.