Talegaon Dabhade : स्मायलिंग स्टारमध्ये दिवाळी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘स्मायलिंग स्टार’ या बालसंस्कार वर्गाने मोठ्या (Talegaon Dabhade) उत्साहात दिवाळी साजरी केली. शाळेत दिवे लाऊन फटाके फोडून दिवाळी आनंदाने साजरी झाली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्व लघु नाटिकेतून समजावून दिले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या.

यावेळी शाळेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे,सुप्रिया काकडे,सोनल काकडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीरा चव्हाण यांनी केले. यानंतर भारतीय संस्कृती, परंपरा, गोमातेची पूजा व तिचे महत्त्व तसेच मोठ्यांचा आदर ही सर्व मूल्य दिवाळी सणावर आधारित एका नाटीकेतून दाखविण्यात आली. ही नाटिका मीरा चव्हाण,श्रावणी देसाई,अश्विनी भट,नयना खांदवे, अश्विनी काळे,पुजा मुठाळ व शितल आयनापार्थी यांनी सादर केले.

Talegaon Dabhade : वारंगवाडी, गोळेवाडी येथील लहान मुलांची रक्तगट तपासणी

यानंतर स्मायलींग स्टार मधील विद्यार्थ्यांना चित्रकलेची मॅजिक वही भेट म्हणून देण्यात आली. पालकांना व शाळेतील शिक्षकांना (Talegaon Dabhade) मिठाई देण्यात आली. भारतीय संस्कृतीनुसार दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यानी शिक्षक व पालकांसोबत फटाके उडविण्याचा आस्वाद घेतला.

शाळेच्या शिक्षकांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग दर्शविला. पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका ज्योती सावंत,रमा बागुल व कीर्ती कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती काळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.