Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ( Talegaon Dabhade)  करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल यानिमित्त माहिती देण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.

Talegaon Dabhade : जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी हितेश राठोड यांची निवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे प्राचार्य डॉ विलास देवतारे यांचा हस्ते पूजन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले.

ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी आदी मान्यवर ( Talegaon Dabhade)  उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.