Talegaon Dabhade : किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांवर जिवघेणा वार

एमपीसी न्यूज – केवळ पहातोय या कारणावरून चार ते(Talegaon Dabhade) पाच तरुणांनी मारहाण करत हत्याराने वार करत खूनी हल्ला केला. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार शनिवारी (दि.23) तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज जवळ घडला.

याप्रकरणी कौस्तुभ किसन जगताप (वय 21 रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली असून मोहन उर्फ चिक्या शिंदे, शाहरूख शेख, वरूण माने, राज साठे व इतर दोन इसम यांच्यावर गुहा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : जन सामान्यांच्या आशा,आकांशा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी पूर्ण केल्या – शंकर जगताप  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे (Talegaon Dabhade)कॉलेजवरून घरी जात असताना फिर्यादी यांनी पाहिले या कारणावरून आरोपींनी भांडणास सुरुवात केली. यावेळी हाताने व धरदार शस्त्राने मारहाण करत गंभीर जखमी केले. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.