Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमावर दादासाहेब सोंडगे यांचे मार्गदर्शन 

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान (Talegaon Dabhade) शाखा पदवीनंतर (बी एस्सी) असणाऱ्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा यावर दादासाहेब सोंडगे सर यांचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विज्ञान विभागामार्फत शुक्रवारी (दि. 21) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पदवीनंतर असणाऱ्या परीक्षा व त्यांची कशी तयारी करायची आणि त्याचे फायदे याबाबत दादासाहेब सोंडगे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्यातील IFAS संस्थेचे जे 12 वेळा NET परीक्षा पास झाले आहेत दादासाहेब सोंडगे यांनी सरस्वती पूजन व वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे होते.

दादासाहेब सरानी B.Sc नंतर व M.Sc नंतर असलेल्या अनेक fellowship परीक्षा संदर्भात माहिती दिली. व विद्यार्थीचे अनेक शंकाचे निरसन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मलघे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथड म्हणून येत आहे.इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थी शास्त्रज्ञ व्हावा अशी इच्छा यावेळी डाॅ मलघे यांनी व्यक्त  केली. पुढील काही काळात M.Sc देखील सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी डाॅ मलघे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक सुमित हुलावळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमा दरम्यान विज्ञान विभाग प्रमुख रोहित नागलगाव यांनी सर्वांचे स्वागत केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेले संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी कार्यक्रमा विषयी आपले मनोगत व्यक्त करत दादासाहेबांनी केलेल्या  (Talegaon Dabhade) मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.