Talegaon Dabhade : तळेगावात रंगणार आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयेला

एमपीसी न्यूज – कुलस्वामिनी महिला मंच मावळ (Talegaon Dabhade) यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदेश बांदेकर प्रस्तुत सौ-भाग्यवती मावळ हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 18) होणार आहे. यामध्ये आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

 

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ,किस्से गप्पा, गेम शो होणार असून पहिल्या क्रमांकास टू व्हीलर व मानाची पैठणी, दुसऱ्या क्रमांकास एक तोळा सोन्याचे नाणे, तिसरा क्रमांक सात ग्रॅम सोन्याचे नाणे, चौथा क्रमांक पाच ग्राम सोन्याचे नाणे, पाचवा क्रमांक तीन ग्रॅम सोन्याचे नाणे.

 

Vadgaon Maval : शहर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करा 

 

तसेच सहभागी झालेल्या महिला मधून टाकी ड्रॉ द्वारे 10 बक्षिसे देण्यात येणार असून यात पहिल्या प्रथम विजेत्यास अर्धा तोळे सोन्याचे नाणे, दुसऱ्या विजेत्यास रेफ्रिजरेटर, (Talegaon Dabhade) तिसरे विजेत्यास वॉशिंग मशीन, चौथ्या विजेत्यास एलईडी टीव्ही, पाचव्या विजेत्यास घरगुती आटा चक्की, सहाव्या विजेत्यास मायक्रोवेव्ह ओवन,सातव्या विजेत्यास मोबाईल फोन ठेवायचा फ्रुट प्रोसेसर, नवव्या विजेत्या कुलर, दहाव्या विजेत्यास गॅस शेगडी देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.