Talegaon Dabhade News : मुसळधार पावसामुळे माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळले

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने माळवाडी हद्दीत धोकादायक होर्डिंग्ज कोसळून विजेचा ट्रान्सफॉर्मर पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मावळ तालुक्यातील धोकादायक होर्डिंग्जडचा प्रश्न ऐरणीवर आला. मावळ तालुक्यातील जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग व तळेगाव दाभाडे – चाकण राष्ट्रीय मार्गावर दुतर्फा जाहिरातीचे होर्डिंग्ज लावले असून सर्व होर्डिंग्ज लोखंडी असल्याने अनेक होर्डिंग्ज धोकादायक झाले आहेत. होर्डिंग्ज कोसळल्यावरच प्रश्न समोर येतो.

शुक्रवारी (दि. 14) साडेचारच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात होर्डिंग्ज कोसळले. ते होर्डिंग्ज वीज ट्रान्सफॉर्मरवर पडले. वीज पुरवठा खंडित करुन होर्डिंग्ज बाजूला काढण्यात आले. यावेळी सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या दुतर्फा लांबलचक रांगा लागल्या होत्या. यावेळी सुनील चव्हाण यांच्या क्रेनने होर्डिंग्ज बाजूला करण्यात आला.

मावळ तालुक्यातील धोकादायक होर्डिंग्ज वर कारवाई करण्याची मागणी सोमा भेगडे, अतुल राऊत, आफताब सय्यद, मयुर झोडगे आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.