Talegaon Dabhade : रविवारी तळेगावमधील बाजार थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानात भरणार

एमपीसी न्यूज – डॉ.  बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन ( Talegaon Dabhade ) करण्यात आले असल्याने तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि.14 एप्रिल) भरणारा बाजार मुख्य बाजारपेठ येथे न भरता थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानात भरणार आहे. याबाबत नगर परिषदेकडून माहिती देण्यात आली आहे. पुढील रविवारी म्हणजेच 21 एप्रिल रोजी मुख्य बाजारपेठेत नेहमीप्रमाणे बाजार भरेल, असेही नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे.

Today’s Horoscope 13 April  2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14  एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून होणार असल्याने मिरवणुकीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.पुढील रविवारी आठवडे बाजार हा पूर्वीच्याच ठिकाणी  ( Talegaon Dabhade ) भरविण्यात येईल असेही नगरपरिषदेने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.