Talegaon Dabhade: राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत अनशुळ मोरे, माधवन जोशी,आयुषी राणे, निखिल पवार प्रथम

Talegaon Dabhade: Results of state level online painting competition organized on the occasion of Maharashtra Day announced श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत तीन हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे, महाराष्ट्र दिनानिमित्त ऑनलाईन महाराष्ट्र राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून ३००० चित्रांचा  सहभाग नोंदवण्यात आला. या स्पर्धेचा निकाल श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष दत्तात्रय खांडगे यांच्या 51 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकताच जाहीर करण्यात  आला.

राज्यभरातून कोरोना संक्रमणामुळे चिंताजनक परिस्थिती असताना, कोरोना रोगाविषयी जनजागृतीच्या उद्देशाने ह्या स्पर्धेचे आयोजन दोन्ही  संस्थेद्वारे  करण्यात आले होते. स्पर्धकांनी घरीच चित्र काढून त्याचा फोटो व्हाट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवायचे असे स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेचा कालावधी शुक्रवार  1 ते 20 मे असा होता.

स्पर्धेचेविषय कोरोना विषयक जनजागृतीच्या अंतर्गत (1) डॉक्टर  (2) नर्स (3) पोलीस बांधव  (4) समाजसेवक (5) स्वच्छता मोहीम असे होते. स्पर्धेचे परीक्षण अतुल गायकवाड व प्रा. अनंत डेरे ( प्राध्यापक, अभिनव कला महाविद्यालय, पुणे) या तज्ज्ञ परीक्षकांनी केले. या स्पर्धेकरिता इयत्ता पहिली  ते चौथी ‘अ’ गट, पाचवी ते सातवी ‘ब ‘ गट, आठवी ते दहावी ‘क गट व खुला गट असे चार गट नियोजित करण्यात आले होते.

स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकासाठी 1,501 रु रोख रक्कम,सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्रक, व्दितीय क्रमांकासाठी 1,001 रु रोख रक्कम सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्रक, 701 रु रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप होते. या खेरीज सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

अ गट इयत्ता पहिली ते चौथी

  • प्रथम क्रमांक – अनशुळ विलास मोरे, हॅचिंग हायस्कूल, पुणे
  • द्वितीय क्रमांक – कृष्णा किरण कटके, मुक्तांगण इंग्लिश स्कूल सहकार नगर, पुणे.
  • तृतीय क्रमांक – स्पर्श सचिन ठोरगे, लिपजोड, पिंगळे सौदागर, पुणे
  • चतुर्थ क्रमांक – तनिष्का विशाल गुंजाळ, वाशिंगम हायस्कूल, मुंबई

ब गट इयत्ता पाचवी ते सातवी

  • प्रथम क्रमांक – माधवन नितेश जोशी, सरस्वती विद्या मंदिर, कराड, सतारा
  • द्वितीय क्रमांक – धनश्री विनोद चौधरी, नॉवेल  इंटरनॅशनल स्कूल,निगडी, पुणे
  • तृतीय क्रमांक – सार्थक संदीप चौधरी, अल्फोन्सा हायस्कूल काळेवाडी, पिंपरी, पुणे
  • चतुर्थ क्रमांक – निधी आशिष झंवर, सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा, पुणे
  • पंचम क्रमांक –  ओम राजेंद्र परदेशी, आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, भवानी पेठ, पुणे

क गट इयत्ता आठवी ते दहावी

  • प्रथम क्रमांक – आयुशी जगदीश राणे, फातिमा हायस्कूल बदलापूर
  • द्वितीय क्रमांक – मित हेमंत साखरिया, आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, भवानी पेठ, पुणे
  • तृतीय क्रमांक – मयंक वाडवाणी, सेंट अ‍ॅलार्ड हायस्कूल, अंधेरी, मुंबई 93.
  • चतुर्थ क्रमांक – प्रियाल किरण कटके, मुक्तांगण इंग्लिश स्कूल, पुणे
  • पंचम क्रमांक – मुद्रा भरणे, एसएनबीपी इंटरनॅशनल, मोरवाडी, पुणे

खुला गट

  • प्रथम क्रमांक – निखिल पवार,पुणे  
  • द्वितीय क्रमांक – श्रीकृष्ण ढोरे, पुणे
  • तृतीय क्रमांक – चेतन सखाला, मुंबई
  • चतुर्थ क्रमांक – केदार साखाराम टेमकर, पिंपळे सौदागर
  • पंचम क्रमांक -अदिती सिंह, तळेगाव दाभाडे, मावळ,पुणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.