Talegaon Dabhade : विविध उपक्रमांतून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

एमपीसी न्युज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, वक्तृत्व आदिंमधून सावित्रीबाईंना अभिवादन केले. (Talegaon Dabhade) सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची केलेली सुरुवात आणि त्याचे आज महत्त्व याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात  मुख्याध्यापिका शमशाद शेख,पर्यवेक्षिका रेणू शर्मा  यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सावित्रीबाईंना अभिवादन करून कार्यक्रम सुरू झाला.

या दिनाचे औचित्य साधून शाळेतर्फे अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘नृत्य,गायन स्पर्धा’;’ वक्तृत्व स्पर्धा’ घेण्यात आल्या. कुमारी सुरक्षा कटरे या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने ‘मी सावित्रीबाई फुले बोलते ..’यातून सावित्रीबाई यांचा जीवन प्रवास सर्वांसमक्ष मांडला. (Talegaon Dabhade) इयत्ता सहावी मधील कु.शिप्रा उपाध्याय, गौरी शिंदे, अलिज्बा शेख;इयत्ता पाचवी मधील कु.स्वरांजली मराठे, मयुरी दरेकर, त्रिशा विभुते या सर्व विद्यार्थिनींनी सुंदर असे नृत्य सादर केले. इयत्ता आठवी मधील कु.निधी बिराडे, इयत्ता सहावी मधील सृष्टी खांजोडे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा पोवाडा गायन केले.  इयत्ता सातवी मधील कुमारी ऋतुजा सोनटक्के हिने आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या संघर्षाची माहिती दिली.

Pune News : संगमवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे स्टील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण

‘फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ?’याबाबतचे विचार शालेय शिक्षिका सौ.प्रियंका मोहिते यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.समाजात मुलींच्या हक्काच्या, शिक्षणाच्या,आरोग्याविषयीची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले .या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन  मुख्याध्यापिका शेख, पर्यवेक्षिका शर्मा मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे,शालेय समिती अध्यक्ष रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उ-र्हे,सचिव मिलिंद शेलार, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी ‘बालिका दिनाच्या’ शुभेच्छा देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. “घेऊ सावित्रीचे व्रत, ज्योतिबांचा जागर, ज्ञानाचा सागर हो सारे |”असा संकल्प करीत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.