Vadgaon Maval : महाराष्ट्र माळी महासंघाच्या मावळ तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

एमपीसी न्युज – महाराष्ट्र माळी महासंघातर्फे मावळ तालुक्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. मावळ तालुका अध्यक्षपदी रविंद्र विधाटे, (Vadgaon Maval) उपाध्यक्ष पदी संदीप शिंदे तर मावळ तालुका युवक अध्यक्ष म्हणून संजय शेवकर व युवक उपाध्यक्ष म्हणून महेश टिळेकर, सरचिटणीसपदी कैलास यादव यांची निवड करण्यात आली. माळी महासंघ पुणे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष दिलीप विधाटे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुमित्रा जाधव,राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष काळुराम गायकवाड उपस्थित होते.

Talegaon Dabhade : विविध उपक्रमांतून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मागील महिन्यात महाराष्ट्र माळी महासंघातर्फे मावळ तालुक्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून मावळमध्ये माळी समाजाचे संघटन अधिक मजबूत होताना दिसत आहे. माळी महासंघ पुणे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष दिलीप विधाटे यांनी मावळ तालुका अध्यक्षपदी (Vadgaon Maval) रविंद्र विधाटे यांची नियुक्ती तसेच संदीप शिंदे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. मावळ तालुका युवक अध्यक्ष म्हणून संजय शेवकर व युवक उपाध्यक्ष म्हणून महेश टिळेकर तर सरचिटणीसपदी कैलास यादव यांची निवड झाली आहे.

मावळ तालुक्यात माळी समाज उन्नती मंडळ तालुक्यात सक्रिय असून नव्याने सुरू झालेले माळी महासंघ यांचे संघटन भविष्यात अधिक मजबूत होताना दिसेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.