Pune Crime : कोंढव्यातील ‘त्या’ अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लागला, अल्पवयीन गुन्हेगारासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. दगडाने चेहरा विद्रूप करून या महिलेचा खून करण्यात आला होत. (Pune Crime) या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. या महिलेने आरोपीकडे दारू मागितल्याने त्यांनी चिडून जाऊन या महिलेचा खून केला. 

जैद आसिफ शेख (वय 20, रा. शिवनेरी नगर गल्ली नंबर 11 कोंढवा पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या महिलेची ओळख अद्यापही पटली नाही. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी कोंढवा परिसरातील मोकळ्या मैदानात झाडाच्या बसले होते. त्यावेळी त्या ठिकाणी मयत महिला आली आणि तिने मला दारू द्या असे म्हणून आरोपी सोबत वाद घातला. (Pune Crime) याचा राग आल्याने आरोपींनी तिला धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर जवळच असलेला मोठा दगड तिच्या तोंडावर दोघांनीही आळीपाळीने मारले. दगडाचा घाव जोरदार बसल्याने महिला जागीच निपचित पडली. त्यानंतर आरोपी पळून गेले. अशी कबुली स्वतः आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Vadgaon Maval : महाराष्ट्र माळी महासंघाच्या मावळ तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

दरम्यान मयत महिलेची ओळख अद्यापही पटली नाही. या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहे. मिसिंग महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.