Pune News : आईच्या मित्रानेच केला घात , 13 वर्षीय मुलीवर तीन महिन्यांपासून बलात्कार

एमपीसी न्यूज : आपली आई ज्या माणसासोबत राहते, त्याच्यावर विश्वास ठेवेते, त्याला पप्पा म्हणणे एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले. (Pune News) त्या नराधमाने सलग तीन मनापासून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

काकासाहेब उर्फ सुरज व्यंकटेश शिंदे (वय 30, रा. भैरोबा मंदिराजवळ, हिंगणे मळा, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बलात्कार आणि पॅाक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune Crime : कोंढव्यातील ‘त्या’ अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लागला, अल्पवयीन गुन्हेगारासह दोघांना अटक

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आम्ही आणि फिर्यादी हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मागील काही दिवसांपासून ते एकत्रच राहतात. त्यामुळे फिर्यादी यांची 13 वर्षीय मुलगी आपला पप्पा म्हणते. मात्र या मुलीच्या अज्ञानपणाचा आणि अल्पवयाचा फायदा घेऊन आरोपीने तिला त्याच्या शिफ्ट कार मधून हडपसर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिचेवर लैंगिक अत्याचार केला.

मागील तीन महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता. दरम्यान फिर्यादी महिलेचा 3 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार लक्षात आला. नंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. (Pune News) पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.