Talegaon Dabhade : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी तळेगाव नगरी सज्ज

एमपीसी न्यूज – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या 10 जानेवारीस (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे शहरात होत आहे. ते यशस्वी करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले.

 

रविवारी तळेगाव शहरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे, पदाधिकारी,कलाकार,कार्येकर्ते, सभासद व संस्था प्रतिनिधी यांची  विशेष सभा येथील तळेगाव जनरल हाॅस्पिटलच्या रिक्रिएशन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष भोईर यांनी ही  घोषणा केली.

 

यासभेस शास्त्रीय संगीत गायक सुरेश  साखवळकर,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे,पुणे पीपल्स बॅंकेचे माजी अध्यक्ष,विद्यमान संचालक   बबनराव भेगडे,माजी उपनगराध्यक्ष, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके,हरिश्चंद्र गडसिंग आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

Pimpri : पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकात उद्या महिला शिक्षण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

 

यावेळी बोलताना श्री साखवळकर  म्हणाले की तळेगाव नगरी ही ऐतिहासिक,धार्मिक,आणी  सांस्कृतिक परंपरा लाभलेली नगरी असुन या नगरीत साहित्य, संगीत, कला,नाट्य बहरलेले असुन या कला विकसित झालेल्या आहेत.

 

शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे पुणे जिल्ह्यात होत असुन  10 जानेवारीला येथे  “चला हवा येऊ द्या” चे ज्येष्ठ  कलाकार येणार आहेत. असे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी  सांगितले. तर हे नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही  सर्वजणं  सज्ज  असल्याचे तळेगाव शाखेचे अध्यक्ष  सुरेश धोत्रे यांनी यावेळी सांगितले.

 

या सभेचे सुत्रसंचालन पत्रकार राजेश बारणे यांनी तर स्वागत प्रसाद मुंगी यांनी केले मिलिंद निकम यांनी  आभार मानले.

 

यावेळी सम्मेलन यशस्वी  करण्यासाठी डाॅ मीनल कुलकर्णी, शुभांगी  कार्ले,सुहास धस, नंदकुमार कोतुळकर आदींनी मोलाच्या (Talegaon Dabhade) सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.