Talegaon Dabhade : सुदवडी मावळ येथील अवैध्यरित्या सुरु असलेली दारूभट्टी उध्वस्त; ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सुदवडी मावळ येथील स्वराज हॉटेल मागील शेतापासून आतमध्ये सुधा नदीच्या कडेला अवैध्यरित्या चालु असलेली गावठी दारू काढण्यासाठी हातभट्टी रसायन लावले असल्याची गुप्त माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक पाटिल यांनी दुपारी ४:३० वाजता सुदवडी गावातील सुधा नदीच्या कडेने फिरून अवैध्यरित्या चालु असलेली गावठी दारू हातभट्टीचा शोध घेतला.

सुधा नदीच्या बंधाऱ्या जवळ दाटझाडीमध्ये दोन ५०० लिटर क्षमता असलेले लोखंडी बॅरल जमीनी मध्ये अर्धवट खोल गाडलेले दिसुन आले.जवळच दोन महिला कच्ची रसायने उकळवण्यासाठी चुल पेटवताना दिसल्या सहायक पोलिस निरीक्षक पाटिल यांनी त्यांना पकडून ताब्यात घेतले असता त्यांचे नाव छाया सुरेश राठोड (वय ४५ वर्ष रा.येलवाडी ता. खेड), बसंती मदन राठोड (वय ४० वर्ष रा.सुदवडी इंदोरी टोल नाक्याजवळ) असे समजले. स्थानिक जागेमध्ये जवळील परिसरात शोधा शोध केली असता दोन ५०० लिटर क्षमता असलेले लोखंडी बॅरल मध्ये गावठी हातभट्टी दारू काढण्यासाठी लावलेले रसायन रापत ठेवलेले निदर्शनास आले.

  • वरील दोन्ही महिला गावठी हातभट्टी ची दारू काढण्यासाठी भट्टी लावण्याची तयारी करत होत्या. त्यांच्या कडून ६००० रूपये किमतीचे २ लोखंडी बॅरल, ३२००० रूपये किमतीचे सुमारे ८०० लीटर कच्चे रसायन,५००० रूपये किमतीचे १० मोकळे काळ्या रंगाचे प्लास्टिक चे कँड,असा एकुण ३८५०० रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रसायनाचा थोडेसा घटक एकाबाटली मध्ये जाग्यावर लेबल लाऊन जप्त केले.

उर्वरित माल वाहूननेण्यास शक्य नसल्यामुळे त्याचा जागीच नाश करण्यात आला. तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजमाने, सहायक पोलिस निरीक्षक पाटिल मॅडम,सोरटे पोलिस,काळे पोलिस दाभणे यांच्या मार्फ़त ही कारवाई करण्यात आली पुढील तपास चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.