Talegaon Dabhade : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पाच हजार 100 दिव्यांनी उजळले ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर

एमपीसी न्यूज – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. 18) जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली. श्री डोळसनाथ महाराज मंदिर परिसरात पाच हजार 100 दिवे लावण्यात आले. या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती. जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात ” ‘एक दिवा मांगल्याचा’ मावळ प्रांती जपला शिवबाच्या आठवणींचा ठेवा ..! सारे मिळूनी आज पुन्हा उजळू मांगल्याचा दिवा..!!” या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीच्या आवती भोवती तब्बल 5 हजार 100 आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करून नयनरम्य, भव्य दिव्य व अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोष भेगडे, डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, यांच्या समवेत उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, चंद्रभान खळदे, संचालक अंकुश आंबेकर, गणेश काकडे, आनंद भेगडे, दिलीप खळदे, विशाल पवार, अशोक काकडे, विशाल दाभाडे, ऑर्डनन्स डेपो अध्यक्ष अजित शेलार, मा.नगरसेवक यादवेंद्र खळदे, नगरसेविका, प्राची दळवी(हेंद्रे ), नंदकुमार कोतूळकर, उपाध्यक्ष राहुल पारगे, संचालक वैभव भेगडे, शंकर भेगडे, खजिनदार निलेश राक्षे आदी मान्यवर व तरुण ऐक्य मित्र मंडळ सर्व कार्यकर्ते, श्री डोळसनाथ पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, दैनंदिन बचत प्रतिनिधी, महिला बचत गट, श्री डोळसनाथ तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व तळेगावासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते. आमदार सुनील आण्णा शेळके यांनी सुद्धा कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.

यावेळी मुख्य सभामंडपात कोल्हापूर महालक्ष्मी देवीची रांगोळी, महिला सशक्तीकरण, छत्रपती शिवाजी महाराज, मावळ तालुका कोरोना लसीकरण मोहीम, व्यायामाचे महत्व – निरोगी शरीर हाच खरा दागिना, हरितपृथ्वी, ऑनलाईन शाळा व मुले, वाचन संस्कृती, रक्तदान- श्रेष्ठदान अश्या विविध सामाजिक रांगोळ्यांद्वारे सामाजिकतेचा संदेश देण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा, असुरांचा व अंधकारमय बाबींचा नाश केला आणि मानवाला प्रकाशमान जीवन प्राप्त करुन दिले या अनुषंगाने दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने अवघे मंदिर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने प्रकाशमान झाले.

दरम्यान, मान्यवरांचे स्वागत संस्थेचे आधारस्तंभ नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले. दीपोत्सवाचे दीप प्रज्वलन, श्री डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, हेमलता खळदे, शोभा भेगडे, माया भेगडे, नगरसेवक अरुण माने व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री डोळसनाथ पतसंस्था व संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या दीपोत्सवाचे हे 6 वे वर्ष असून मागील 5 वर्षांपासून साकारत असलेल्या दीपोत्सवाच्या यंदाच्या 6 व्या वर्षीही उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्याबद्दल उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोष भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

सजावटीकरिता विशेष सहकार्य राकेश मुगल, श्री डोळसनाथ पथसंस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, दैनंदिन बचत प्रतिनिधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक अतुल राऊत यांनी केले. श्रीपती बाबा भजनी मंडळ कर्जत, रायगड यांच्या सुमधुर भक्ती – संगीत व श्री. कुलकर्णी काका यांच्या मराठी भक्तिगीते व गाणी सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.