Dapodi News : नियोजित ‘एसआरए’ प्रकल्प रद्द होणे म्हणजे नागरिकांच्या एकजुटीचा विजय – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – दापोडी येथील नियोजित ‘एसआरए’ प्रकल्प रद्द करण्याचा ठराव गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला. हा नागरिकांच्या एकजुटीचा विजय आहे. प्रशासनाने नागरीहिताचे प्रकल्प राबवित असताना कायद्याचे पालन करणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प करण्यासाठी प्रशासन आणि मनपातील पदाधिकारी नागरीहिताकडे दुर्लक्ष करुन ठेकेदारांना फायदेशीर ठरतील, असे निर्णय घेताना दिसत होते. नियोजित ‘एसआरए’ प्रकल्प रद्द होणे म्हणजे नागरिकांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

या प्रकल्पातील बाधित होणा-या नागरिकांचे हित पाहणे मावळचा खासदार या नात्याने माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी ‘दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समिती’ च्या वतीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आणि हा प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करण्याचा ठराव संमत झाला असेही बारणे म्हणाले. खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीची शनिवारी 13 नोव्हेंबरला पत्रकार परिषद झाली आणि सोमवारी 15 नोव्हेंबरला महानगरपालिकेवर एल्गार महामोर्चा काढण्यात आला होता.

यानंतर गुरुवारी 18 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत (सभा क्र. 64, विषय क्र. 3, विषय : कार्यपत्रिका क्र. 64 विषय क्र. 3 यास उपसूचना मंजूर करणेबाबत.; मा. महापालिका सभा ठराव क्र. 553 दिनांक -04/06/2020 मध्ये उपसुचनेद्वारे समाविष्ट करण्यात आलेला खालीलप्रमाणे मजकूर वगळण्यास मान्यता देण्यात यावी.) हा ठराव उपसूचनेव्दारे बहुमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव संमत झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ रहिवाशांनी दापोडी एसआरए विरोधी संयुक्त कृती समितीचे समन्वयक राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली दापोडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आनंदोत्सव साजरा करीत पेढे वाटले.

यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, माजी नगरसेवक सनी ओव्हाळ, रमा ओव्हाळ, विनय शिंदे, गोपाळ मोरे, वेष्णाराम चौधरी, संजय भिंगारदिवे, जन्नत सैय्यद, मनोज उप्पार, वामन कांबळे, श्रीमंत शिंदे, सुरेश कांबळे, कमलेश पिल्ले, ज्ञानेश्वर वायकर, दिलीप निकाळजे, सुरेखा जोशी, सिंकदर सूर्यवंशी, प्रमोद गायकवाड, अजय पाटील, राकेश तारु, अजय ठोंबरे, इमाम शेख, जाकीर शेख, सुप्रिया काटे, सुखदेव सोनवणे, नवनाथ डांगे, बाळासो जगदाळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.