Maval Crime News : उर्से ग्रामपंचायतीत पुन्हा वाद; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून उर्से ग्रामपंचायतीत उपसरपंच पदावरून वाद सुरु आहे. यातून तीन जणांनी मिळून बुधवारी (दि. 17) रात्री एकाला बेदम मारहाण केली.

सुलतान महामूद मुलानी (वय 46, रा. उर्से, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण शंकर राऊत (वय 35), पवन शंकर राऊत (वय 33), शंकर खंडू राऊत (वय 60, सर्व रा. उर्से, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण राऊत याच्या पत्नी सविता राऊत या उर्से गावच्या उपसरपंच आहेत. सविता राऊत यांनी राजीनामा देण्यावरून उर्से ग्रामपंचायत सदस्य आणि अन्य मंडळींचा मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यातूनच आरोपी पवन राऊत याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारले. त्यात फिर्यादी यांचा हात फ्रॅक्चर झाला. आरोपी किरण आणि शंकर यांनी फिर्यादी यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.