Pune News : सिंहगड रोड येथील जेष्ठ नागरिकाची 21 लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड येथील जेष्ठ नागरिकाची 21 लाख रूपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. अज्ञात इसमाने जेष्ठ नागरिकाचे क्रेडीट कार्ड वापरून तसेच बचत खात्यावरील असे एकूण 21 लाख 11 हजार 060 रूपये ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक केली आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड येथील 64 वर्षीय जेष्ठ नागरिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी इसमाचे खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून 12 लाख रूपये तसेच बचत खात्यावरील 8 आणि एफ.डी खात्यावरील 80 हजार रूपये असे एकूण 21 लाख 11 हजार 060 रूपये ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.