Chakan Crime News : चाकणमध्ये भर दिवसा एक लाख 64 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – चाकण येथील जुनी बाजारपेठ येथे भर दिवसा एका सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख 64 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) सकाळी सव्वाअकरा ते रात्री साडेनऊच्या कालावधीत घडला.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर गुरुवारी कुलूप लावून बंद होते. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातून एक लाख 64 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

चाकण, चिखलीतून दोन दुचाकी चोरीला

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरुच आहे. चाकण आणि चिखली परीसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरुन नेल्या. बाबूराव साहेबराव फुलमाळी (वय 39, रा. मोई. ता. खेड. मूळ रा. जि. अहमदनगर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची 25 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी मोई येथील पुलावरुन चोरुन नेली आहे.

अक्षय कुंडलीक दोडके (वय 31, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोडके यांची आठ हजारांची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.