Talegaon Dabhade : रुडसेट संस्थेला आमदार सुनील शेळके यांची भेट

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील रुड सेट संस्थेला (Talegaon Dabhade) मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सदिच्छा भेट दिली. आमदार शेळके यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्थेच्या कामाचे कौतुक केले. संस्थेत सुरू असलेल्या मोफत प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींची शेळके यांनी संवाद साधला. तसेच संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Pimpri News : बीआरटीएस रोडवर भरधाव दुचाकी चालवत असताना तरुणाचा मृत्यू

तळेगाव दाभाडे येथील रुड सेट संस्थेला मावळचे आमदार सुनील शेळके यांची सदिच्छा भेट. संस्थेला  शेळके यांनी भेट देऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्था करत असलेले कामकाज व चालू असलेल्या प्रशिक्षण वर्गात भेट देऊन चालू असलेल्या ब्युटी पार्लर व्यवस्थापन या प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. संस्था खऱ्या अर्थाने लोकांना आर्थिक संपन्न करत आहे व महिलांसाठी चालू असलेले प्रशिक्षण हे विनामूल्य देत आहात याबद्दल कौतुक केले.

संस्था करत असलेल्या कामाला आमदार शेळके यांनी स्वतःहून सांगितले की या संस्थेला अजून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याकरता स्वतःची जागा उपलब्ध करून देण्यासाठी (Talegaon Dabhade) सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व येत्या काही दिवसांमध्ये संस्थेचे स्वतःच्या वास्तूमध्ये प्रशिक्षण चालू होईल ही ग्वाही दिली. संस्थेचा असलेला उद्देश हा पुढे नेण्यासाठी मी सदैव तुमच्या बरोबर आहे असेही आमदार शेळके यांनी सर्वांना आश्वासित केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.