Talegaon : कलापिनी आयोजित कै. मेजर ना. वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा 2024 उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : सळसळता उत्साह, मुलांचा (Talegaon) चिवचिवाट, सुंदर सुंदर रंगीबिरंगी चित्र, वेगवेगळे रंग असे चित्र 7 जानेवारी रोजी दिवसभर आपल्या कलापिनीच्या प्रांगणात दिसत होते. कारण होतं कै. मेजर ना.वा. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा 2024.

प्राथमिक फेरी 7 जानेवारीला संपन्न झाली. इयत्ता 1 ली ते 10 वी आणि खुला गट ह्यात 800 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांना दिलेल्या विषयांवर त्यांनी खूप सुंदर चित्र रेखाटली. 1 ली ते 4 थी तील बक्षिसपात्र मुले प्राथमिक फेरीतून निवडली गेली, तर 5 वी ते 10 वी तील मुले अंतिम फेरी आणि चित्रकला कार्यशाळेसाठी निवडली गेली.

ही कार्यशाळा 14 जानेवारीला घेण्यात आली.  यासाठी किरण खानखोजे आणि भावना अडसूळ, सुमेध सोनवणे हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्या मुलांची अंतिम फेरी घेऊन त्यांची चित्रे बक्षिसासाठी निवडली गेली. खूप खूप उत्साहात मुलांनी कार्यशाळेचा आनंद आणि उपभोग घेतला.

Pune : राममंदिर सोहळ्यानिमित्त पुणे महानगर समितीतर्फे 13 लाख कुटुंबाशी संपर्क

बक्षीस समारंभ त्याच दिवशी सायंकाळी घेतला गेला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मालिका आणि नाटकांमधून काम केलेले दोन नामवंत कलाकार लाभले.  प्रतिज्ञा करमरकर आणि ओंकार फडके उपस्थित होते.

त्यांनी मुलांना खूप सुंदर मार्गदर्शन करीत त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलांना इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिल्यामुळे कलापिनीचे त्यांनी भरभरून कौतुक केलं. कलामंडळ प्रमुख चेतन भाई शहा यांच्या हस्ते किरण खानखोजे यांचा सत्कार करण्यात आला. खानखोजे यांनी  मुलांनी हा कलेचा वारसा पुढे न्यावा असे सांगितले आणि बहुमोल मार्गदर्शन केले.

संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण  भावना अडसूळ ह्यांनी केलं. त्यांनी आपल्या संवादात मुलांच कौतुक करून ही कला पुढे अजून वाढविण्याचा सल्ला दिला आणि पालकांचे ही अभिनंदन केले.

ह्या चित्रकला स्पर्धेचे प्रायोजक रो.मनोज ढमाले हे (Talegaon) होते. ढमाले डेअरी तर्फे सर्व मुलांना दूध वाटप केले गेले. स्पर्धा संयोजक विराज सवाई ह्यानेही सर्व मुलांशी संवाद साधला. स्पर्धा प्रमुख अशोक बकरे ह्यांनी प्रास्ताविक केले. आभार अंजली सहस्त्रबुध्दे ह्यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी काळे ह्यांनी केले. रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे , पांडुरंग देशमुख , मधुवंती रानडे, सुप्रिया खानोलकर, रश्मी पांढरे, लीना परगी, सुमेध सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली. हितेश शिंदे ह्यांनी फोटोग्राफी केली.

पालक, प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेवटी श्लोक म्हटला गेला. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.