Talegaon News : व्यवसाय, नोकरी करत एक तरी कला जोपासा – राजेश गाडे पाटील

एमपीसी न्यूज – ‘शेतात बी पेरल्यांनंतर पीक येते,धान्य मिळते, ती सृष्टीची कलाच आहे. आपणही आपला व्यवसाय किंवा नोकरी करताना एक तरी कला जोपासली पाहिजे. त्यात खूप आनंद आहे,’ असे मत रोटरी क्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष रो. राजेश गाडे पाटील यांनी व्यक्त केले. खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. चित्रकला स्पर्धेचे हे 38 वे वर्ष आहे. 
कलापिनी, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि रोटरी क्लब ऑफ मावळच्या वतीने आयोजित ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या सुरवातीला दोन तासाची कार्यशाळा घेण्यात आली. विराज सवई व अमृता दामले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष रो.राजेश गाडे पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रो.मनोज ढमाले, पा.प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ मावळ रो. रवींद्र घारे, सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ मावळ रो. दत्तात्रय सावंत, व्हाइस प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ मावळ रो.दीपक चव्हाण, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे सेक्रेटरी रो. शाहीन शेख यांच्या हस्ते पारितोषिक देउन विजेत्यांना गौरविण्यात आले.
https://www.youtube.com/watch?v=cmHfQQGGEJ8
बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन संध्या गाडे यांनी केले. सचिव झेंडे यांनी आभार मानले. श्रीपाद बुरसे, अनघा बुरसे, रवींद्र पांढरे, ज्योती ढमाले, आरती पोलावार, शार्दुल गद्रे, संदीप मनवर, रामचंद्र रानडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट – पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक – सायली नरोटे (कांतीलाल शहा विद्यालय)

द्वितीय क्रमांक – श्रेया भोगील (माऊंट सेंट शाळा)
तृतीय क्रमांक – शांभवी जाधव (मामासाहेब खांडगे शाळा)
उत्तेजनार्थ – स्वरा लखपती, राशी नवले, धनश्री बेलोकर, सिध्दी क्षीरसागर
गट – आठवी ते दहावी
प्रथम क्रमांक – सृष्टी जाधव (हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल)
द्वितीय क्रमांक – रौनक यादव (कृष्णराव भेगडे शाळा)
तृतीय क्रमांक – श्रावणी हेंड्रे (कांतीलाल शहा विद्यालय)
उत्तेजनार्थ – आर्या झोपे, आदित्य जंगम, ईश्वरी दिघे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.