Pune : शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी टीडीएफ कटिबद्ध – जी.के. थोरात

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफचे अधिकृत उमेदवार जी के थोरात यांचा पुणे शहरातील पुणे कॅन्टोनमेंट विभाग शाळा भेट दौरा दि 10 जानेवारी रोजी संपन्न झाला. यामध्ये त्यानी शिक्षकांशी संवाद साधला व शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या. याप्रसंगी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय उत्साहाने जी.के थोरात यांना प्रतिसाद दिला.

या भेट दौऱ्यात पुणे कॅन्टोनमेंट विभाग अध्यक्ष राज मुजावर, सचिव सचिन वाल्मिकी, पुणे शहर उपाध्यक्ष सुनिल गिरमे सर, पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे संचालक व समूपदेशक विजय कचरे, पुणे शहर टीडीएफ अध्यक्ष सचिन दुर्गाडे रोहन कांबळे, दिनेश देवकरसर आणि विविध शाळांमधील प्राचार्य व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.