Alandi News : आळंदीतील विविध विद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार, राज्यात सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला गेला.आळंदी येथील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयातील  काही विद्यार्थीच सोमवारी शिक्षक होऊन शाळेत शिकवण्याचे काम केले. तसेच दुराफे विद्यालय विश्वस्त,यशवंत संघर्ष सेना,जनहित फाउंडेशन यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा पुस्तक, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. संत ज्ञानेश्वर व  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायकर यांनी या शाळेची जडणघडण कोणकोणत्या विविध खडतर मार्गाने झाली याची माहिती दिली.या शाळेतील विश्वस्त मुक्ताताई शिरोळे म्हणाल्या, समाजात सध्या फुकटचे सल्ले व सूचना देणारी  काही व्यक्ती निर्माण झाल्या आहे की ज्या चांगल्या दिशेने जाणाऱ्या माणसाला, तो योग्य दिशेने न जाता अयोग्य दिशेने कसा जाईल याच्या प्रयत्नात असतात.त्यामुळे समाजातील ह्या काही  व्यक्ती लहानापासूनपासून ज्येष्ठापर्यंत व्यक्तींना नेहमीच सल्ले सूचना देण्याचे काम करत असतात.त्यांचे सल्ले सूचना आपल्यासाठी योग्य की अयोग्य हे अंतर्मुख विचार करून तपासून पाहणे गरजेचे. समाजात व्यक्ती शेवटपर्यंत कोणाकडून ना कोणाकडून काही तरी शिकतच असतो. तो अखंड विद्यार्थीच असतो.यशवंत संघर्ष सेनेचे भागवत काटकर, विष्णू कुऱ्हाडे व मनोहर दिवाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सामाजिक कार्याशी निगडीत असलेल्या व्यक्तीचा श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अर्जुन मेदनकर, गणेश गरुड,  उपमुख्याध्यापक गावडे सर व इतर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्यावतीने किल्ले शिवनेरी स्थळ दर्शन व तिथेच शिक्षक सन्मान सोहळा  आयोजीत करून पुढे लेण्याद्री व ओझर गणपती दर्शना करिता शिक्षकांना नेण्यात आले होते. संस्कार गरुकुल या शाळेत ही काही विद्यार्थी शिक्षक बनून तेथील शाळेतील मुलांना शिकवण्याचे कार्य करत होते.तसेच या शाळेच्यावतीने सांस्कृतिक  कार्यक्रम घेण्यात आले होते. येथील सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.