Talegaon News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुनेच्या कारला अपघात

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुनेच्या कारला पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोलनाक्यावर सोमवारी संध्याकाळी किरकोळ अपघात झाला होता.सुदैवाने या अपघातात राणे यांच्या कुटुंबातील कोणीही जखमी झालेले नाही.

याबाबत शिरगांव पोलीस चौकीतील पोलिसांनी माहिती दिली की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांची पत्नी व कुटुंबिय सोमवारी संध्याकाळी मुंबईहून लाल बागच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुण्याला जात होते.त्यांची कार उर्से टोल नाक्यावर 6.30 वा चे सुमारास पोहचून लेन नंबर 3 मध्ये थांबली असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली.या अपघातात कारची डिक्की चेंबली व तिचे नुकसान झाले आहे.

या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.ट्रकचालक नारायण गौडा, (वय 32 वर्षे रा. कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.