Talegaon Dabhade News : विद्यार्थ्यांची औद्योगिक जगताची ओळख होण्यासाठी नूतन अभियांत्रिकीत ‘टेकमंथन’

विविध आस्थापनांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – औदयोगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकीच्या ई अँड टिसी विभागामार्फत ‘टेकमंथन -2022’ चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम यातून जास्त प्रमाणात होईल हे या टेकमंथनचे उद्धिष्ट होते.

या कार्यक्रमास इन्फिनिटी टेक्नॉलॉजिचे आनंद स्वामी, सीटीओ आयईईई पुणे विभागाचे अध्यक्ष डॉ. गिरीश खिलारी, प्रशिया इंजिनिअर्स अँड ऑटोमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता कावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थचे सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, विश्वस्त सोनबा गोपाळे, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, एनसीईआर च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, विभाप्रमुख डॉ. विलास देवतारे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भोसरी, पुणे, चाकण, आंबी, उर्से या औदयोगिक क्षेत्रातील विविध चाळीस आस्थापनातील व्यवस्थापक उपस्थित होते. तद्प्रसंगी वीस आस्थापनांशी सामंजस्य करार करण्यात आले. आस्थापनांनी आरएनडी, इनक्युबेशन सेंटर, इंटर्नशिप, इंडस्ट्रियल भेटी, उद्योजकांच्या मुलाखती, नोकरीच्या संधी, विद्यार्थी प्रशिक्षण आदी मुद्दयावर विद्यार्थ्यांना आस्थापनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.

“विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये तसेच औदयोगिक आस्थापनांमध्ये इंटर्नशिप द्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला पाहिजे, त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना सहकार्य करू,” असे स्वामी यांनी सूचित केले.

“विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना फक्त पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता तांत्रिक कौशल्य देखील आत्मसात करून स्वतःचा विकास करावा” असे खिलारी बोलताना म्हणाले.

“अभ्यासक्रम आणि उद्योग जगतातील तंत्रज्ञान यातील अंतर हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच कमी करून प्रत्यक्ष औदयोगिक समूहासोबत काम करून, औदयोगिक भेटी दाव्यात. स्वतःला विकसित करण्यासाठी आजचा उपक्रम अतिशय सुंदर आहे,” असे मत कावडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गायत्री अंबाडकर यांनी केले तर प्रा. किरण जाधव यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सागर जोशी व प्राध्यापक वर्ग यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.