Chinchwad : चालकाला धमकावून कार पळवली

एमपीसी न्यूज – मध्यरात्री सोसायटीसमोर कार घेऊन थांबलेल्या एका कार चालकाला धमकावून तीन जणांनी मिळून त्याची कार पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री शाहूनगर चिंचवड येथे घडली.

दत्तात्रय उर्फ मयूर नथू कुडले (वय 27, रा. गणेश नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कार चालविण्याचे काम करतात. ते शाहूनगरमधील अमिता सोसायटीसमोर त्यांची इरटिगा कार (एम एच 14 / एफ सी 1356) घेऊन थांबले होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या तीन जणांनी दत्तात्रय यांना धमकावून त्यांची कार आणि एक मोबाईल फोन असा एकूण पाच लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. तसेच दत्तात्रय यांचा दुसरा मोबाईल फोन फेकून त्याचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.