Civic Facilitation Center : शहरात नवीन 20 नागरी सुविधा केंद्र होणार सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नागरिकांना महापालिकेच्या सेवा, सुविधा त्वरीत उपलब्ध होण्यासाठी व नवीन प्रभाग रचनेनुसार सर्व प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येकी 4 नागरी सुविधा केंद्र (Civic Facilitation Center)  स्थापन करण्याचे धोरण आहे. त्यानुसार नव्याने 20 नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

Sidhu Moose Wala Death Update : सिद्धू मूसेवाला खून प्रकरण; गोळ्या झाडणारे 8 पैकी दोन शूटर पुण्यातले?

शहरात आतापर्यंत 75 नागरी सुविधा केंद्र (Civic Facilitation Center)  सुरू झाली आहेत. शहरातील विविध भागात खासगी तत्वावर नागरी सुविधा केंद्र चालक नियुक्त करण्यासाठी सातव्या टप्प्यामध्ये 33 जणांचे अर्ज आले होते. यामध्ये पात्र ठरलेल्या 20 अर्जदारांना अटी, शर्तीनुसार मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र चालक प्रती सेवा 20 रूपये नागरिकांकडून घेऊ शकतात. त्यापैकी 5 रूपये महापालिकेस प्राप्त होणार आहेत. मिळकत कर, पाणीपट्टी इत्यादी बिलासाठी प्रती पावती 5 रूपये पालिकेमार्फत केंद्र चालकास तीन वर्ष देण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.