Pune News : मार्केट यार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेली टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेली टोळी गजाआपुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी आडबाजूला दबा धरून बसलेल्या टोळीतील पाच जणांना गुन्हे शाखेच्या  पोलिसांनी अटक केली. 27 जानेवारी च्या रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. 

याप्रकरणी पोलीस हवालदार रुपेश सोपानराव वाघमारे (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी कोंडीबा उर्फ नाना बाबू पांढरे (वय 35) प्रसाद आनंदा मालुसरे (वय 26) गणेश भीमा शिंदे (वय 30) आकाश भगवान दुधाळे (वय 23) आणि अविनाश राम निंबाळकर (वय 23) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की गुन्हे शाखेचे कर्मचारी स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना काही लोक हे मार्केट येथील नंदनवन लॉज शेजारी असणाऱ्या गल्लीत दबा धरून बसल्याचे दिसले. तरी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता दरोडा टाकण्यासाठी लागणारे घातक धारदार शस्त्र, नायलॉन दोरी, मिरची पावडर असे सापडले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना अटक केली. स्वारगेट पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.