Pimpri News: महापालिका मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देणार, ‘या’ क्रमांकावर संपर्क साधा

एमपीसी न्यूज – ऑक्सिजनची गरज असलेल्या सामान्य रुग्णांना, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स मशीनद्वारे ,घरीच ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे. शहरातील काही उद्योजकांनी व्यवसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून, महापालिकेला ऑक्सीजन मशीन देऊ केले आहेत. त्याची सेवा गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. आवश्यक रुग्णांनी या 7768005888 हेल्पलाई नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

गरजू रुग्णांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तपासणी केल्यानंतर, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. मशीन वापरण्या संदर्भात प्रशिक्षण व माहिती संबंधितांना देण्यात येणार आहे. मात्र हे मशीन विजेवर चालत असल्याने, वीज पुरवठा खंडित झाल्यास, त्याचा रुग्णावर विपरीत परिणाम होऊ नये. यासाठी पर्यायी ऑक्सीजन सिलेंडर जवळ ठेवण्याची जबाबदारी, रुग्णांची असणार आहे. या कालावधीत वेळोवेळी, ऑक्सिजनची तपासणी व तज्ञ डॉक्टरांशी संपर्क ठेवण्याचीही जबाबदारी रुग्णांची असेल.

पंधरा दिवसांनी रुग्णाला, ऑक्सिजनच्या आवश्यकतेच्या बाबतची पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. त्यानंतर मशीन  कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्याकडे जमा करावयाचे आहे. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या  सामान्य रुग्णांनी महापालिकेच्या 77 68 00 58 88 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेने  केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.