India Corona Update : ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या दहा लाखांच्या खाली, पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के  

एमपीसी न्यूज – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 67,597 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 1,80,456 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा लाखांच्या खाली आली असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट देखील 5.02 टक्के एवढा झाला आहे.  

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 23 लाख 39 हजार 611 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 08 लाख 40 हजार 658 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 96.46 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या घटली असून, सध्या देशात 9 लाख 94 हजार 891ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 1 हजार 188 कोरोना रुग्ण दगावले असून, आजवर 5 लाख 04 हजार 062 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 2.90 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 74 कोटी 29 लाख 08 हजार 121 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 13.46 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 170 कोटी 21 लाख 72 हजार 615 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.