Pune : शिक्षक पत्नीला वर्गातून बाहेर काढत पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आपल्या शिक्षक पत्नीला वर्गाच्या बाहेर काढून पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी (दि.28) दुपारी पावणेतीनच्या सुमारास जिल्हा प्राथमिक शाळा नऱ्हे येथे घडली आहे.
संतोष नामदेव चव्हाण (वय 39), असे यातील आरोपीचे नाव आहे. 

याप्रकरणी आशा संतोष चव्हाण (वय 38, रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा आणि आरोपी संतोष हे पती पत्नी आहेत. आशा या आपल्या सहशिक्षिका स्मिता बोराडे यांच्यासोबत चौथीच्या वर्गात जेवण करत असताना अचानक त्यांचे पती तेथे आले आणि त्यांना कोर्टात का आली नाहीस, असे विचारत शाळेच्या वर्गातून बाहेर काढत हातातील पिशवीतील प्लास्टिकची बाटली बाहेर काढून बाटलीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून व दोन वेळा काडी पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला.

आरोपी पतीवर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून याप्रकरणी पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.