Savitribai Phule : प्रशिक्षण संस्थेस ‘सावित्रीबाई फुले अकादमी’ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक’ असे नाव देणार

एमपीसी न्यूज – ठाणे महापालिकेच्या सी.डी. देशमुख प्रशासकीय (Savitribai Phule) प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर संलग्न परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षण संस्थेस पिंपरी-चिंचवड महापालिका संचालित ‘सावित्रीबाई फुले अकादमी’ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक असे नाव दिले जाणार आहे. त्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 44 कोटी 87 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना आजच्या बैठकीत प्रशासक पाटील यांनी मंजुरी दिली. तसेच भूमकर चौक ते मनपा हद्दीपर्यंतच्या कामास स्थळबदल करण्यास मान्यता देणे, टेल्को रस्त्यावरील केएसबी चौक ते यशवंतनगर चौक पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि स्थापत्य विषयक कामे करणे, अग्निशमन विभागातील कर्मचा-यांच्या विविध अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रमांकारिता धोरण ठरविण्यास मान्यता देणे, मनपाच्या जागेवर मल्टी लेव्हल पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट फॅसिलीटीचे डिझाईन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्स्फर या तत्वावर विकसित करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करणे, आदी विषयांचा समावेश होता.

स्थायी समितीची मान्यता आवश्यक (Savitribai Phule) असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  प्रभाग क्र.1 चिखली येथील मोरेवस्ती, सोनावणेवस्ती रस्ता ते मोरेवस्ती नाला परिसर, म्हेत्रेवस्ती आणि  परिसरात आवश्यकतेनुसार जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी 32 लाख 93 हजार रुपये खर्चास प्रभाग क्र.7 भोसरी येथील विविध रस्त्याचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी 39 लाख रुपये खर्चास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.

MPC News Event : दृक्श्राव्य व प्रकट मुलाखतींच्या माध्यमातून शनिवारी उलगडणार ऐतिहासिक चित्रपटांच्या जन्मकथा

देहुरोड मिलिटरी स्टेशन येथे 1 लाख वृक्षारोपण करून दोन वर्षांकरिता देखभाल काम वनविकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. या देखभाल कामास येणाऱ्या 7 कोटी 68 लाख रुपये  खर्च होणार आहेत.  महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, दुर्गा देवी उद्यान, भोसरी सहल केंद्र उद्यान व अंकुशराव लांडगे नाट्यगृह उद्यान, वीर सावरकर उद्यान (गणेश तलाव) उद्यान देखभाल व संरक्षणकामी देण्यात येणार आहेत. याकामी 4 कोटी 87 लाख रुपये खर्च होतील. भोसरी प्राधिकरण पेठ क्र.7 (बेसिन-डी) पेठ क्र.10 (बेसिन-ए-बी-) व मध्यवर्ती सुविधा केंद्रामधील पावसाळी पाणी व्यवस्थापन नाला सुशोभिकरण आणि नाला चॅनलायझेशन कामाची देखभाल करण्यासाठी 1 कोटी 22 लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

‘ह’ प्रभागातील जलनि:सारण नलिकांची (Savitribai Phule) वार्षिक यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यात येणार आहे तसेच चोक-अपची कामे करण्यात येणार आहेत, या कामासाठी 1 कोटी 31 लाख रुपये खर्च होतील. खाजगी वाटाघाटी समितीने मंजूर विकास योजनेतील रस्ते व आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधीत मिळकतधारकास खाजगी वाटाघाटीने देण्यासाठी मंजूरी देण्यात  आली आहे. त्या अनुषंगाने लागणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, वकील फी व इतर अनुषंगिक 7 कोटी 55 लाख रुपये खर्चास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय-पदव्युत्तर संस्था येथील मध्यवर्ती निर्जंतूकीकरण केंद्र (सीएसएसडी) अद्ययावत व नुतनीकरण करण्यास 17 कोटी 58 लाख रुपये खर्च होणार आहे. या खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत मंजूरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.