Dehu Crime News: महिलेला 4-5 जणांच्या टोळक्याची घरी जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण

पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून वाद,

एमपीसी न्यूज – मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला. त्यावेळी त्या इसमाने महिलेला शिवीगाळ केली. महिला घरी गेल्यावर या इसमाने 4-5 जणांच्या टोळक्यासह महिलेच्या घरी जाऊन तिच्या लहान भावाला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले तसेच, फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माळवडे नगर, किवळे याठिकाणी बुधवारी (दि. 04) हा प्रकार घडला.

याप्रकरणी महिलेने शुक्रवारी (दि.06) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चंदु झोंबाडे, शार्दुल ठाकूर यांच्यासह इतर चार ते पाच इसमांविरोधात भारतीय दंड विधान कलम (452,324,143,147,148,149,323,427.504) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मित्राच्या पार्टीत गेल्या होत्या. ड्रिंक घेतली असल्याने त्या बाहेर येऊन हॉर्न वाजवत गाडी घेऊन आल्या. त्यावेळी आरोपी चंदु झोंबाडे याने फिर्यादी यांना अडवून जोरात गाडी का चालवता याबाबत विचारणा केली. यावरून फिर्यादी, त्यांचा भाऊ यांना आरोपीने शिवीगाळ केली. फिर्यादी याच्या भावाने भांडण मिटवून फिर्यादी यांना घरी घेऊन गेले.

त्यांनतर आरोपी यांनी आरोपी शार्दुल ठाकूर यांच्यासह इतर चार ते पाच इसमांसोबत फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या भावला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले तसेच, फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.