Chakan News : खेड मध्ये 23 नवे कोरोना रुग्ण ; 51 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी  (दि. 6 ऑगस्ट) 14 गावे आणि 2 पालिकांमध्ये 23 रुग्ण मिळून आले आहेत.  खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 603 झाला आहे. यापैकी 32 हजार 922 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 200 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 481 एवढा आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 18 रुग्ण, चाकण 3, आळंदी 0, राजगुरुनगर 3 असे एकुण 23 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
आंबेठाण ,चास ,कमान,कान्हेवाडी, केळगाव,खालुंब्रे ,खरपुडी बु., निघोजे ,वराळे, वेताळे ,वाकी खु. या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.

चऱ्होली खु. ,कडधे  मध्ये प्रत्येकी 2 रुग्ण तर  काळूस मध्ये ३ रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.