Pune News: स्टडी सेंटरमध्ये अभ्यास करत होती तरुणी, मात्र जागेवरच कोसळली

एमपीसी न्यूज : पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका लायब्ररीत अभ्यास करणाऱ्या तरुणीचा दुःखद अंत झाला. ही तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. वडगाव शेरी परिसरातील एका स्टडी सेंटर मध्ये ही तरुणी अभ्यास करत होती. यादरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
पूजा वसंत राठोड (वय 25) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पूजा मोची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावातील रहिवासी आहे. बीएससी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच दुसरीकडे ती एका खाजगी कंपनीत नोकरी देखील करत होते.

दरम्यान वडगाव शेरी परिसरातील एका स्टडी सेंटर मध्ये मंगळवारी अभ्यास करत होती.. यावेळी तिला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय हुशार आणि होतकरू असलेल्या या तरुणीच्या निधनाने तिच्या गावावर शोककळा पसरली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.