PCMC News:  महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील झाले  ‘आयएएस’!

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची बढतीने आयएएसकेडरमध्ये निवड झाली आहे.(PCMC News) त्यांचा सनदी सेवेत  (‘आयएएस‘) समावेश झाल्याची अधिसूचना भारत सरकारने आज (गुरुवारी) जारी केली. अत्यंत कार्यक्षम, मितभाषी अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे.

अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील हे 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी रुजू झाले होते. महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून संतोष पाटील यांनी दोन वर्षे काम केले. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली.(PCMC News)  मितभाषी असलेल्या पाटील यांनी कोणत्याही वादात न पडता महापालिकेत सर्वसमावेशक कामगिरी केली. कोरोना महामारीत आरोग्य, वैद्यकीय विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कोरोनाची परिस्थिती हातळण्यासाठी पहिल्या दिवसापासून पाटील कार्यरत राहिले. अत्यंत कार्यक्षम, मितभाषी अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे.

Alandi rain : आळंदी मध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

पाटील यांना 17 डिसेंबर 2020 रोजी राज्य सरकारने बढती दिली. त्यांची  बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर करण्यात आली होती.(PCMC News) दीड महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.  भारत सरकारने संतोष पाटील यांची बढतीने ‘आयएएस’ केडरमध्ये निवड झाल्याची अधिसूचना जारी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.