Crime News : प्रवासा दरम्यान महिलेकडील 2.85 लाखाच्या मालाची चोरी

एमपीसी न्यूज – बस व रिक्षामधून प्रवास करताना एका महिलेची 2.85 लाख रुपयांचा माल असलेली कापडी पिशवी चोरट्याने चोरल्याची घटना मंगळवारी (दि.6) घडली आहे.

याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad News : भाई असल्याचे सांगत लोखंडी कोयत्याने दहशत माजवून हाताने मारहाण करणाऱ्याला अटक

फिर्यादी त्यांच्या गहुंजे येथील राहत्या घरातून ते तनिष्क ज्वेलर्स मोरवाडी, पिंपरीच्या दरम्यान पीएमटी बस व रिक्षामधून प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या जवळील लेदर पर्सची चैन उघडली व त्यामधील कापडी पिशवीमध्ये असलेले 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2.85 लाख रुपये किमतीचा माल व रोख रक्कम चोरुन नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.