Pune News : SRPF च्या आवारातून चंदनाच्या झाडाची चोरी

एमपीसी न्यूज : SRPF च्या आवारातून चंदनाच्या झाडाची चोरी मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात चंदन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडले आहेत. यातील बहुतांश घटना या महत्त्वाच्या संस्था आणि कंपन्यांच्या आवारातील असल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातील चंदनाची चार झाडे चोरीला गेली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस फौजदार विक्रांत सूर्यवंशी यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा विस्तीर्ण परिसर आहे. याच परिसरात असलेली चंदनाची चार झाडे अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन महिन्यांपूर्वी देखील या ठिकाणी अशीच घटना उघडकीस आली होती. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.