Thergaon: जुन्या भांडणातून 20 वर्षीय तरुणाचा खून

Thergaon: Murder of a 20-year-old youth in an old quarrel

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणातून तीन जणांनी कोयत्याने वार करून तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.5) रात्री पावणेआठच्या सुमारास थेरगाव-जगताप नगर येथे घडली.

ऋषभ बालाजी गायकवाड (वय 20 वर्ष, रा. जगताप नगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

ऋषभ आणि त्याचे मित्र रात्री बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणातून त्यांच्यात बाचाबाची झाली. तिघांनी ऋषभ याच्यावर कोयत्याने वार केले.

जखमी झालेल्या ऋषभला उपचारासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.