Pune News : अल्पवयीन प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवून गर्भपात केला, प्रियकरासह दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज – अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीर संबंध ठेवून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला अवैधरित्या गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी प्रियकरासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांसह गर्भपात करणार्‍या डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली. 

अमित अबदेश यादव (वय 18 रा. निरामय हॉस्पिटल जवळ, वडगावशेरी) व त्याचा साथीदार धनंजय नामदेव रोकडे (वय 38 ,रा. वडगावशेरी गावठाण) यांच्यासह गर्भपात करणारा डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपे (वय 59, रा. वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली. या सर्वांवर बलात्कार व पोस्को कायद्यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमित यादव याचे एका अल्पवयीन तरूणीसोबत प्रेम संबंध होते. त्या संबंधातूनच त्याने तिच्या सोबत शरीरसंबंध ठेवले. यातून अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली होती. त्यानंतर आरोपीच्या मित्राने देखील तिच्या सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले होते. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडीओ तयार करत समाज माध्यमावर देखील आरोपीने पाठवला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.