Chinchwad News : जुन्या भांडणातून टोळक्याकडून सिंमेटच्या ब्लॉकने तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून (Chinchwad News) दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजता अजंठा नगर, चिंचवड येथे घडली.

मरीअप्पा यकप्पा धोत्रे (वय 32, रा. अजंठानगर, चिंचवड), सुनील डोंगरे, सोमनाथ शिंदे अशी जखमींची नावे आहेत. धोत्रे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Rahatani : रहाटणीत चित्रपटगृहाच्या शौचालयात महिलेसोबत गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

त्यानुसार राजू ठोसर, विजय ठोसर, नाना कांबळे, अभिषेक मुकेश कांबळे, आंबू कांबळे, रोहित ज्ञानेश्वर दंड्गुले, साहिल रशीद पठाण, सोन्या बगाडे, तुषार मुकेश कांबळे आणि अन्य तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धोत्रे यांचा भाचा नागेश पवार याच्या सोबत आंबू कांबळे, रोहित दंडगुले आणि साहिल पठाण यांचे भांडण झाले होते. (Chinchwad News) त्या भांडणाच्या कारणावरून रोहित दंडगुले याने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून सिमेंटच्या ब्लॉकने फिर्यादी यांच्या नाकावर, सुनील डोंगरे यांच्या गालावर आणि सोमनाथ शिंदे यांच्या हातावर, छातीवर मारले. यात सुनील डोंगरे आणि सोमनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.