Rahatani : रहाटणीत चित्रपटगृहाच्या शौचालयात महिलेसोबत गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रहाटणी येथील स्पॉट 18 मॉलमधील (Rahatani) सिटी प्राईड रॉयल सिनेमा या चित्रपट गृहाच्या शौचालयात एका महिलेचा विनयभंग झाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : कर्नाटक येथून पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक, 9 किलोचा गांजा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, त्यांचा भाऊ आणि पती सोबत रहाटणी येथील स्पॉट 18 मॉलमधील सिटी प्राईड रॉयल सिनेमा या चित्रपट गृहाट गुरुवारी दुपारी चित्रपट पाहण्यासाठी गेल्या होत्या. चित्रपट सुरु होण्यापूर्वी फिर्यादी शौचालयात गेल्या. (Rahatani) त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने महिलांच्या शौचालयात येऊन फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर तो अनोळखी व्यक्ती तिथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.